अ‍ॅपशहर

पारिजातनगरात पाणीबाणी

एक महिन्यापासून सिडको एन-४ येथील पारिजातनगर व परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागात महापालिकेच्या नळांना थेंबभरही पाणी येत नाही, असा आरोप नागरिकांनी केला असून नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Maharashtra Times 26 Apr 2017, 3:00 am
पारिजातनगरात पाणीबाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
पारिजातनगरात पाणीबाणी

ऐन उन्हाळ्यात पाण्यावाचून नागरिक त्रस्त
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एक महिन्यापासून सिडको एन-४ येथील पारिजातनगर व परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागात महापालिकेच्या नळांना थेंबभरही पाणी येत नाही, असा आरोप नागरिकांनी केला असून नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
पारिजात नगर हा उच्चभ्रु, मध्यमवर्गीय लोकांची वसाहत असलेल्या या भाग. नोकरदार, व्यापारी, व्यवसायिक मंडळी मोठ्या प्रमाणात येथे राहतात. हाकेच्या अंतरावर असलेल्या हनुमाननगर येथील पाण्याच्या टाकीवरून येथील नागरिकांना महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील इतर वसाहतीप्रमाणेच येथेही तीन दिवसआड पाणी होतो, परंतु गेल्या महिन्याभरापासून येथील नागरिकांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. बहुतेक ठिकाणी नळाला कमी दाबाने व अत्यंत कमी वेळ पाणी येत आहे. तर काही ठिकाणी नळाला एक थेंबही पाणी येत नसल्याने नागरिकांनी सांगितले.
पाण्याच्या टाकीत पुरेसा पाणीसाठा असतानाही पाणी पुरवठा पुरेसा, नियमित का होत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या वतीन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, पण जागोजागी केवळ खोदकाम केले जात असून प्रश्न मात्र निकाली काढला जात नाही, असा आरोपही होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाणी प्रश्न भेडसावत आहे. विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत असून याकडे महापालिकेने गांभिर्याने पाहून प्रश्नांची ठोसपणे सोडवणूक करावी.
बाबुराव कवसकर, नागरिक
नियमित पाणी पुरवठा होत नाही. कमी दाबाने येते तर काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
दीपक डोईफोडे, नागरिक
काही दिवसांपासून पाणी पुरवठा योग्य होत नाही, अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांना नियमित पाणी पुरवठा व्हावा, यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.
माधुरी अदवंत, नगरसेविका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज