अ‍ॅपशहर

एमजीएममध्ये मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंग

महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या परिसरातील मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंगचे उद्‍घाटन महाराष्ट्र दिनी (१ मे) रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे पर्यावरणमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होणार आहे.

Maharashtra Times 1 May 2017, 3:00 am
एमजीएममध्ये मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
एमजीएममध्ये मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंग

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्‍घाटन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या परिसरातील मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंगचे उद्‍घाटन महाराष्ट्र दिनी (१ मे) रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे पर्यावरणमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होणार आहे.

एमजीएमने हॉस्पिटलच्या कर्मचारी व रुग्णांसाठी अद्ययावत चार मजली मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंग उभारली आहे. एमजीएम हॉस्पिटल रुग्णसेवा देण्यासठी कटिबद्ध असून हजारो रुग्णांच्या पसंतीला उतरलेल्या या हॉस्पिटलमध्ये मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंग उभारल्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे. या बिल्डिंगमध्ये पर्यावरणाला पूरक अनेक उपाय योजना केल्या आहेत. ज्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे लाऊन, सोलर पॅनलचे छत देण्याचे योजिले आहे. याबरोबर फायर सेफ्टी, सीसीटीव्ही कॅमेरे, लिफ्टची सुविधाही देण्यात आली आहे. मल्टी लेव्हल पार्किंग ही मराठवाड्यातील पहिली बिल्डिंग आहे.

या उद्‍घाटनप्रसंगी एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सूर्यवंशी यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज