अ‍ॅपशहर

सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गाचा सर्व्हे करणार का?

सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गात आैरंगाबादचा समावेश करून सर्व्हेक्षण करणार काय? यासंबंधी ३० नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यासाठी रेल्वे विभागास वेळ देण्यात आला आहे. या याचिका जनहिताच्या असून रेल्वेने मोठे व्हिजन नजरेसमोर घेऊन निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायलयाच्या आैरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केली. हा मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून यासंबंधी माहिती घेण्याचे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. मंगेश पाटील यांनी बुधवारी रेल्वेस दिले.

Maharashtra Times 9 Nov 2017, 3:00 am
सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गाचा सर्व्हे करणार का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गाचा सर्व्हे करणार का?

आैरंगाबाद खंडपीठाची रेल्वे विभागास विचारणा

म. टा . विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गात आैरंगाबादचा समावेश करून सर्व्हेक्षण करणार काय? यासंबंधी ३० नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यासाठी रेल्वे विभागास वेळ देण्यात आला आहे. या याचिका जनहिताच्या असून रेल्वेने मोठे व्हिजन नजरेसमोर घेऊन निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायलयाच्या आैरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केली. हा मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून यासंबंधी माहिती घेण्याचे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. मंगेश पाटील यांनी बुधवारी रेल्वेस दिले.
मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक आेमप्रकाश वर्मा यांनी जनहित याचिका दाखल करून २०१३ मध्ये आव्हान दिले होते. पर्यटनास प्राधान्य देण्यासाठी तत्कालिन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी सोलापूर -जळगाव या ४५० कि. मी. मार्गाच्या सर्व्हेक्षणास मान्यता दिली होती. हा मार्ग सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, बीड, गेवराई, पैठण, आैरंगाबाद, घृष्णेश्वर, सिल्लोड, अजिंठा मार्गे जळगाव असा करण्याचे निश्चित केले होते, परंतु हा मार्ग गेवराई, अंबड, जालना, भोकरदन, अजिंठा- जळगाव असा वळविण्यात आला. या मार्गाचा सर्वे नकारात्मक आल्याने ही योजना थंड बस्त्यात टाकण्यात आली.
एखाद्या मार्गाचे सर्व्हेक्षण दोन ते तीन वेगवेगळ्या मार्गांनी करणे गरजेचे आहे. तशी कायद्यात तरतूद आहे, परंतु केवळ जालनामार्गे सर्व्हेक्षण नकारात्मक आल्याने रेल्वेने इतर मार्गांचा सर्व्हेच केला नाही. पर्यंटनाच्या दृष्टीने आैरंगाबाद-घृष्णेश्वर मार्ग फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे दुसरा सर्व्हे करण्यात यावा, असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील प्रज्ञा तळेकर यांनी केला. रेल्वेच्या वतीने मनीष नावंदर यांनी काम पाहिले.

व्हिजन मोठे ठेवा
मोठे व्हिजन ठेवून रेल्वेने आैरंगाबाद मार्गे सर्व्हेक्षण करावे. केवळ रेल्वेचा विकास नसून या नवीन मार्गामुळे सबंध मराठवाडा व पर्यटनाचा विकास होणार आहे. यावर खर्च मोठ्या प्रमाणावर होणार असला तरी उत्पन्न मात्र दहा पटीने मिळणार असल्याचे खंडपीठाने सांगितले. यावर पुन्हा विचार करण्यात यावा, असे कोर्टाने सुचविले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज