अ‍ॅपशहर

औरंगाबादमध्ये दोन गटांत वाद; दोघांचा मृत्यू

मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2018, 10:29 am
औरंगाबाद:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad


मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेत ३० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

बेकायदा नळ कनेक्शन तोडण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता, असं सांगण्यात येत आहे. तलावरी, चाकू, लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेकही केली. यात ३० जण जखमी झाले आहेत. तर सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसही जखमी झाले. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. परिसरात असलेल्या इतरही गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शांतता ठेवा, तसेच सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज