अ‍ॅपशहर

मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही; आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

आठवले हे आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असून सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले हे आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असून सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Maharashtra Times 21 Feb 2022, 7:56 pm
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी गंभीर विचार केला पाहिजे. मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे, असं म्हणत केंद्रीय सामजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. आठवले हे आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असून सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramdas athawale


यावेळी बोलताना आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी ऐक्य आम्हाला मान्य नाही ही भूमिका सोडली पाहिजे.ऐक्याचा विषय मी मांडलेला आहे, पण प्रकाश आंबेडकर हे भेटण्यासाठी वेळ देतील अस वाटत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य शक्य नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी गांभीर विचार केला पाहिजे. मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे,असं आठवले म्हणाले.

धक्कादायक! स्कुल बस मागे घेताना तरुण चिरडला, अखेरचा ठरला आजचा दिवस
सुडाचे राजकारण सुरू आहे...

आमच्यावर नेहमी सुडाचे राजकारण करत असल्याचं हे आरोप करतात, पण राणेंना महानगरपालिकेने घर बांधण्याची परवानगी देऊनही त्यांच्या घरी आज महानगरपालिकाचे लोक गेले. त्यामुळे राणे यांच्या घरावर कारवाई करणारे अधिकारी इतके वर्ष झोपले होते का?, कंगना रानावत यांचे कार्यालय देखील तोडण्यात आले होते,त्यामुळे सुडाची भूमिका असू नयेत असा टोला आठवले यांनी लगावला.

ठाकरे सरकारवर टीका...

सरकार मॅनेजमेंट करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहेत. सरकार कडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही. सरकार पाडण्याचा संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहे. तसेच शिवसेना-भाजपचे भांडण मिटले पाहिजे असं आम्हाला वाटते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, संजय राऊत यांना समज द्यावा, शिवसेना भाजप एकत्र आले पाहिजे, दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जुन्या फार्मुल्यावर एक असल्यास भाजप देखील तयार होईल, असेही आठवले म्हणाले.

महत्वाचे लेख