अ‍ॅपशहर

निर्लेपचे ८० टक्के शेअर बजाज इलेक्ट्रिकल्सकडे

म टा...

Maharashtra Times 16 Jun 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

होम अप्लायन्सेस निर्मितीत प्रसिद्ध असलेल्या निर्लेप अप्लायन्सेसचे ८० टक्के शेअर्स बजाज इलेक्ट्रिकल्सने खरेदी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकीत शुक्रवारी निर्णय झाला.

कार्पोरेट जगतात कंपन्यांच्या भागभांडवलांच्या खरेदी विक्रीबाबत धोरणात्मक निर्णय कामयच घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून निर्लेप अप्लायन्सेसच्या ८० टक्के शेअर्सची खरेदी करण्याचा निर्णय बजाज इलेक्ट्रिकल्सने घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनात यासंदर्भात निर्णय झाला होता. बजाज इलेक्ट्रिकल्सच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. तीत या प्रस्तावास मंजुरी मिळाली. निर्लेप अप्लायन्सेसच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यातही निर्णय झाला.

निर्लेपमध्ये भोगले कुटुबीयांचा वाटा आता कमी झाला आहे. यापुढे कंपनीचा कारभार बजाज इलेक्ट्रिकल्सकडे देण्यात आला आहे. इंजिनिअरिंग उत्पादनांवर फोकस केला जाणार आहे.

- मुकुंद भोगले, एमडी, निर्लेप समूह

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज