औरंगाबाद : दसरा सणाच्या दोन दिवस आधीच केंद्र सरकारने टपाल कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. यंदा टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना ६० दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना सूमारे १४ हजार रुपयांचा बोनस हाती येईल. वर्ग तीन तसेच वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांसह ग्रामीण डाक सेवकांना याचा लाभ होणार असून, राजपत्रित अधिकाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार नाही.
टपाल कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस
दसरा सणाच्या दोन दिवस आधीच केंद्र सरकारने टपाल कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे यंदा टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना ६० दिवसांचा बोनस जाहीर केला आहे...
Maharashtra Times 17 Oct 2018, 4:00 am