औरंगाबाद: केंद्र शासनाने घेतलेल्या नागरी सुधारणा कायदा अर्थात 'सीएए'ला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे बुधवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता क्रांतीचौकातून ही रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचा पूर्वीचा मार्ग बदलण्यात आला आहे. नवीन नियोजनानुसार ही रॅली आता क्रांतीचौक, सतीश पेट्रोल पंप, विवेकानंद कॉलेज, समर्थनगर, सावरकर चौक, निराला बाजारमार्गे महात्मा फुले पुतळा चौकात जाणार आहे. या रॅलीत देशभक्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या संयोजकांनी केले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे आज सीएए समर्थन रॅली
केंद्र शासनाने घेतलेल्या नागरी सुधारणा कायदा अर्थात 'सीएए'ला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे बुधवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Dec 2019, 4:00 am