अ‍ॅपशहर

खुनप्रकरणी आरोपीला बेड्या

हायवाचालक बाळू घुगेच्या खुनप्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपील्या बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये मनोज डावरे याचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटाला बाळू घुगे (रा. टीव्ही सेंटर) याच्या फोनवर मनोज डावरेने फोन केला.

Maharashtra Times 23 Sep 2018, 1:16 pm
औरंगाबाद : हायवाचालक बाळू घुगेच्या खुनप्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपील्या बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये मनोज डावरे याचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटाला बाळू घुगे (रा. टीव्ही सेंटर) याच्या फोनवर मनोज डावरेने फोन केला. त्याला घराबाहेर बोलावून घेतले. पैशाच्या देवाण घेवाणावरून व घरातील वस्तू चोरल्यावरून बाळूला मनोज डावरे, नील पाटील, दत्ता भांगे आणि शुभम पाटील यांनी मारहाण केली. त्याचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाकडून देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज