अ‍ॅपशहर

चेक बाउन्स प्रकरणी आरोपीस वर्षाचा कारावास

थकित कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी विश्वकर्मा नागरी सहकारी बँकेने केलेल्या फौजदारी प्रकरणात आरोपीला एक वर्षाचा कारावास व २० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डब्ल्यू. उगले यांनी ठोठावली.

Maharashtra Times 29 Aug 2016, 10:58 am
म. टा. प्रकरणी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cheque bounce case
चेक बाउन्स प्रकरणी आरोपीस वर्षाचा कारावास


थकित कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी विश्वकर्मा नागरी सहकारी बँकेने केलेल्या फौजदारी प्रकरणात आरोपीला एक वर्षाचा कारावास व २० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डब्ल्यू. उगले यांनी ठोठावली.

आरोपी उत्तरेश्वर मुरलीधर कोठावळे याने विश्वकर्मा नागरी सहकारी बँकेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड मुदतीत केली नसल्यामुळे आरोपीकडे कर्जाची थकबाकी झाली होती. बँकेने कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावल्यामुळे आरोपीने आयडीबीआय बँकेच्या शहर शाखेचा १३ हजार रुयांचा धनादेश २१ मार्च २०१३ रोजी बँकेला दिला होता. बँकेने तो धनादेश वटवण्यासाठी बँकेत पाठवला असता, ३० मार्च २०१३ रोजी आरोपीच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे परत आला. त्यानंतर बँकेने आरोपीला नोटिसीद्वारे पैशाची मागणी केली असता, आरोपीने नोटीस प्राप्त होऊनही त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे बँकेने ९ मे २०१३ रोजी आरोपीविरुद्ध धनादेश न वटल्याबाबत तक्रार दाखल केली. त्यासंबंधीचे पुरावेही कोर्टात सादर करण्यात आले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने आरोपीला एक वर्ष साधा कारावास व २० हजार रुपये नुकसान भरपाई व नुकसान भरपाई न भरल्यास पुन्हा एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी बँकेच्या वतीने अॅड. रामनाथ चोभे यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. सचिन चव्हाण, अॅड. अप्पासाहेब राजगुरू, अॅड. सुषमा पाटील, अॅड. रमेश घोडके, अॅड. शितल अनवडे यांनी सहकार्य केले. दरम्यान, आरोपी शिक्षा सुनावताना कोर्टात हजर नसल्यामुळे आरोपीविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज