अ‍ॅपशहर

९५ निवासी भूखंड विक्रीतून सिडकोला २० कोटी

भूखंड विक्रीतून सिडको मालामाल -९५ भूखंडाची विक्री, २० कोटी ४० लाखांचा महसूल म टा...

Maharashtra Times 23 Jan 2018, 3:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम cidco 1

विमानतळाजवळ व विविध भागातील ९५ भूखंडांच्या विक्रीतून सोमवारी एकाच दिवसात सिडकोला २० कोटी ४० लाखांचा महसूल मिळाला. सिडकोतर्फे सोमवारी भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली.
सिडकोतर्फे ११० भूखंडाच्या विक्रीसाठी दोन हजार माहितीपुस्तिकांची विक्री करण्यात आली होती. त्यापैकी १५२४ जणांनी भूखंडासाठी अर्ज सादर केले होते. सिडकोतर्फे ११० पैकी १०१ भूखंडाची सोडत काढण्यात आली. सिडको कार्यालयात सोमवारी दुपारी १२ ते ४ या वेळेत काढण्यात आलेल्या सोडतीवेळी अर्ज केलेल्यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायधीश प्रभाकर उमरीकर, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, मुख्य प्रशासक ओमप्रकाश बकोरिया, प्रशासक पी. एम. सेवतकर, विकास अधिकारी पी. एस. चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. ही सोडत काढल्यानंतर भूखंड मिळालेल्यांनी सपरिवार आनंद व्यक्त केला. यावेळी ९५ भूखंड विकले गेले व त्यातून २० कोटी ४० लाख रुपयांचा महसूल मिळाल्याचे सिडको कार्यालयाकडून सांगण्यात आले. हे भूखंड साठ वर्षांसाठी देण्यात आले आहेत. विमानतळालगतच्या एन २ सर्व्हे नंबर ५९ व ६० मधील भूखंड विकण्यात आले. या प्रक्रियेत सहाय्यक पणन अधिकारी राजय कुरे, वसाहत अधिकारी अस्मिता विर्शीद, प्रभाकर भांबळे आदींनी सहकार्य केले.

विविध भागातील भूखंड

सिडको एन १ मधील २, एन २ ए २-३, एन २ सर्व्हे क्रमांक ८ मधील २, एन २ मधील सर्व्हे क्रमांक १६ मधील ३, एन २ सर्व्हे क्रमांक १७/२२ मधील १२ भूखंड

मदाने ठरले भाग्यवंत


एकूण भूखंडापैकी १५ भूखंड अपंगासाठी राखीव ठेवले होते. अपंग कोट्यातून अशोक लक्ष्मणराव मदाने यांनी भूखंड जाहीर होताच आनंद व्यक्त केला.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज