औरंगाबाद: मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी परिसरात ढोलताशांच्या गजरात मिठाई वाटून व फटाके फोडून जल्लोष केला. शहराध्यक्ष माजी आमदार नामदेवराव पवार, आमदार सुभाष झाबंड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, महापालिका गटनेते भाऊसाहेब जगताप, तालुकाध्यक्ष रामू शेळके, नगरसेवक मोहन साळवे, राहुल सावंत, अशोक डोळस, अंकुशराव चौधरी, राधाकृष्ण गायकवाड, कैसर पठाण, रफिक पटेल, कैलास जुमडे आदी उपस्थित होते. तर सिडको एन २ सिडको येथे ही कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुकुंदवाडीत जल्लोष
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी परिसरात ...
Maharashtra Times 13 Dec 2018, 4:00 am