औरंगाबाद : सिल्क मिल कॉलनी परिसरातील शहानगरात अनेकांना अद्याप नळ जोडणी देण्यात आलेली नाही. या भागात अधिकृतरित्या नळ जोडणी द्यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. सिल्क मिल कॉलनीमधून शहराची मुख्य जलवाहिनी शहरात येते. मात्र, शहानगरमधील मीना मशिदी शेजारच्या भागाला अद्याप पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. या परिसरातील नागरिक महापालिकेकडे नळ जोडणीसाठी शुल्क भरण्यास तयार आहेत. त्यासाठी विशेष शिबिर घेऊन वैध नळ जोडणी द्यावी, अशी मागणी युवा क्रांती दलाचे नीलेश शिंदे यांच्यासह फिरोज खान, शेख इमाम, अली खान, शाहेद मिर्झा आदींनी केली आहे.
‘शहानगरमध्ये वैध नळ जोडणी द्या’
सिल्क मिल कॉलनी परिसरातील शहानगरात अनेकांना अद्याप नळ जोडणी देण्यात आलेली नाही...
Maharashtra Times 28 May 2018, 4:00 am