औरंगाबाद: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान व २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी केंद्रे जाहीर करण्यात आले आहेत. सिल्लोडची शासकीय टेक्निकल शाळा, कन्नड येथे शिवाजी महाविद्यालय, इंडोअर स्टेडिअम, फुलंब्री मतदारसंघासाठी सिपेट इमारत, विमानतळाजवळ, औरंगाबाद मध्यची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा, औरंगाबाद पश्चिमची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद पूर्व-होमगार्ड कार्यालय, एन १२, पैठण मतदारसंघासाठी प्रशासकीय इमारत, संतपीठ, गंगापूरकरिता मुक्तानंद महाविद्यालय, इंडोअर स्टेडियम, आणि वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात मतमोजणी करण्यात येणार आहे.
मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्र जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान व २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Oct 2019, 4:00 am