अ‍ॅपशहर

'कोव्हॅक्सिन'चे डोस उद्यापासून

जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिन लशीचे आठ हजार डोस उपलब्ध झाले असून, शुक्रवारपासून (१२ मार्च) ज्येष्ठ नागरिक तसेच व्याधीग्रस्त ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना ही लस दिली जाणार आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 11 Mar 2021, 1:27 pm
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिन लशीचे आठ हजार डोस उपलब्ध झाले असून, शुक्रवारपासून (१२ मार्च) ज्येष्ठ नागरिक तसेच व्याधीग्रस्त ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना ही लस दिली जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covaxin dose begins from tomorrow for senior citizens
'कोव्हॅक्सिन'चे डोस उद्यापासून


चिकलठाणा परिसरातील जिल्हा रुग्णालयामध्ये लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे व त्याचाच भाग म्हणून बुधवारी (१० मार्च) १९३ नागरिकांचे लसीकरण झाले. आतापर्यंत रुग्णालयामध्ये केवळ कोव्हिशील्ड लस दिली जात होती.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, 'ज्यांना यापूर्वी रुग्णालयामध्ये कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस हा कोविशिल्डचाकोविशिल्डचाच दिला जाणार आहे. त्याच पद्धतीने कोव्हॅक्सिनची लस दिली जाईल.' रुग्णालयामध्ये १८८ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयामध्ये लशीचा दुसरा डोस घेतला. यानिमित्ताने त्यांनी रुग्णसंख्या, लसीकरण व इतर बाबींची माहितीही घेतली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज