पडेगाव : पडेगाव येथील गणेश नगरमध्ये मुलाच्या मृत्युनंतर मातेचा सोमवारी रात्री ११च्या सुमारास घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोरुग्ण असलेली आई देवकाबाई तुलसीराम बाखरे (वय ९०) असे या मातेचे नाव आहे. त्या मुलाच्या मृतदेहाशेजारी तीन दिवसांपासून अन्नपाण्यावाचून पडून होत्या. त्यांना हालचालही करता नव्हती
आपल्या मुलाचा झालेला अंत पाहून मातेचाही मृत्यू झाला. त्यांच्यावर पडेगाव येथील स्मशानभूमित सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांची उपस्थिती होती. मुलाने आईची सेवा करता यावी म्हणून अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला व आईच्या कुशीत देह सोडला. कुणी जवळ नसल्यामुळे आणि आई मनोरुग्ण असल्यामुळे या माता-पुत्राला कुणाचाही आधार नव्हता. आजुबाजुच्या परिसरात चप्पल, बूट शिवून ते उदरनिर्वाह करत असत.