औरंगाबाद: घाटी रुग्णालयातील बंद उपकरणे तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी 'एमआयएम'च्या पदाधिकाऱ्यांनी घाटी प्रशासनाकडे सोमवारी केली. 'एमआयएम'चे शहराध्यक्ष समीर साजेद, मुन्शी पटेल, अनीस खान, इम्रान सालार, जावेद खान, इर्शाद शेख, अजहर पठाण आदींनी मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांची भेट घेतली. डायलिसिस बंद असल्यामुळे रुग्णांच्या गैरसोयीविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी बंद असलेल्या डायलिसिस कक्षाची पाहणी करून तत्काळ दुरुस्तीची मागणी केली. यानंतर गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले डायलिसिसची सुविधा दुपारी चार वाजता सुरू झाली. या विषयी तीन रुग्णांचे डायलिसिस करण्यात आल्याची माहिती डॉ. भट्टाचार्य यांनी दिली.
घाटीतील बंद उपकरणे दुरुस्त करण्याची मागणी
घाटी रुग्णालयातील बंद उपकरणे तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी 'एमआयएम'च्या पदाधिकाऱ्यांनी घाटी प्रशासनाकडे सोमवारी केली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2019, 4:00 am