म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम रविवारी पार पडला.
या कार्यक्रमाल डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. मनीषा टाकळकर, डॉ. सुनील संचेती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष विनोद बोकडिया, मुकेश साहुजी, भारती बागरेचा, भावना सेठिया, करुणा साहुजी, प्रशाल शहा उपस्थित होते. कशीष गंगवाल यांनी नृत्य सादर केले. चाणाक्षी साकला हिने पियानो वाजवला. पाठशाळा समूहनृत्य स्पर्धेत आर्यनंदी पाठशाळा, चिंतामणी पाठशाळा, वज्रस्वामी पाठशाळा, दक्षिणमध्य पाठशाळा, तेरापंथ ज्ञानशाळा, जैन संस्कार पाठशाळा, जैन संस्कार पाठशाळा, विजेते ठरले. महिला नाटिका स्पर्धेत 'लूक अँड लर्न ग्रुप' प्रथम आला. अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळ, नई उमंग ग्रुप, कसारी बाजार महिला मंडळ व त्रिशला महिला मंडळ, महावीर भवन महिला मंडळ विजेते ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना सेठिया व कविता अजमेरा यांनी केले.