अ‍ॅपशहर

डॉ. निपूण विनायक स्वीकारणार मंगळवारी पदभार

महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ निपूण विनायक मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत...

Maharashtra Times 14 May 2018, 4:00 am

औरंगाबाद: महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. निपूण विनायक मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत. शासनाने त्यांची आयुक्तपदी नियुक्ती केली त्यावेळी ते दिल्ली येथे प्रशिक्षण घेत असल्याने पदभार स्वीकारण्यास सरकारकडून वेळ मागून घेतला होता. शहरातील कचराप्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याने तत्कालिन आयुक्त दीपक मुगळीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर ४० दिवसानंतर डॉ. विनायक यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज