अ‍ॅपशहर

पर्यावरणीय अनास्थेमुळे मराठवाड्यात दुष्काळ

‘१९७२ नंतर मराठवाड्यात २०१२ ते २०१६ या चार वर्षात जी भयानक पर्यावरणस्थिती निर्माण झाली, ती नैसर्गिक नव्हती. त्या परिस्थितीला मानवाची पर्यावरणाबाबत अनास्था कारणीभूत होती,’ असे मत पर्यावरण तज्ज्ञ प्रा. विजय दिवाण यांनी विनायकराव पाटील महाविद्यालयात शनिवारी आयोजित राज्यस्तरीय व्याख्यानमालेत व्यक्त केले.

Maharashtra Times 16 Oct 2017, 3:00 am
‘१९७२ नंतर मराठवाड्यात २०१२ ते २०१६ या चार वर्षात जी भयानक पर्यावरणस्थिती निर्माण झाली, ती नैसर्गिक नव्हती. त्या परिस्थितीला मानवाची पर्यावरणाबाबत अनास्था कारणीभूत होती,’ असे मत पर्यावरण तज्ज्ञ प्रा. विजय दिवाण यांनी विनायकराव पाटील महाविद्यालयात शनिवारी आयोजित राज्यस्तरीय व्याख्यानमालेत व्यक्त केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drought in marathwada due to environmental degradation
पर्यावरणीय अनास्थेमुळे मराठवाड्यात दुष्काळ

महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत ते बोलत होते. मराठवाड्यातील जल, जमीन, जंगलचे रक्षण व संवर्धनाचे भान येथील शेतकरी व नागरिकांनी ठेवले नाही, म्हणून मराठवाड्याचा पर्यावरण समतोल ढासळला. तसेच पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास येथील प्रतिकुल भौगोलिक स्थिती ही कारणीभूत आहे. मराठवाड्यातील सर्वांनी आजच सावध होऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर होते. व्यासपीठावर केंद्रीय सदस्य विश्वास पाटील यांची उपस्थिती होती. या व्याख्यानमालेत शुक्रवारी अॅड. असीम सरोदे यांनी, ‘मूलभूत अधिकार व मानवी हक्कांचे राजकारण’ या विषयावर व्याख्यान दिले. देशात आज अघोषित आणीबाणीसारखी स्थिती आहे. लोकशाही शासन प्रणालीमध्ये लोकांचा सहभाग कमी व वैयक्तिक सहभाग वाढत आहे, असे मत अॅड. सरोदे यांनी व्यक्त कले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्त प्राचार्य वसंत ठोंबरे, उत्तमराव साळुंके, हनुमंत बोयनार, अण्णासाहेब शेळके यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज