अ‍ॅपशहर

मम्मी-पप्पा घरची परिस्थिती बघवत नाही, चिठ्ठी लिहीत नोकरीसाठी तरुणीने सोडलं घर

करोना संकट आणि त्यानंतर आता सुरू असलेल्या महागाईने सामान्यांचे जगणं अवघड झालं आहे. रोज कुठल्या ना कुठल्या नव्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागतोय. ग्रामीण भागात तर ही स्थिती अधिकच बिकट आहे. आता घरच्या बिकट परिस्थितीमुळे एका तरुणीने घर सोडल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2022, 1:53 pm
औरंगाबाद : तरुणी प्रियकरासोबत किंवा रागाने घर सोडून गेल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला, ऐकायला मिळतात. मात्र कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी एका तरुणीने घर सोडल्याची घटना शहरातील लक्ष्मीकॉलोनी भागात समोर आली आहे. नोकरी करण्यासाठी घर सोडत असल्याची चिठ्ठी तरुणी आई-वडिलांना लिहिली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार तरुणीच्या आई वडिलांनी केली आहे. सोमाली अनिल नवगिरी ( वय २२ रा. लक्ष्मीकॉलनी, अशोकनगर, छावणी) असे बेपत्ता असलेल्या तरुणीचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम girl leave home for job missing cases registered in aurangabad
मम्मी-पप्पा घरची परिस्थिती बघवत नाही, चिठ्ठी लिहीत नोकरीसाठी तरुणीने सोडलं घर ( प्रातिनिधिक फोटो )


सोमालीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तारुण्यात तिच्याकडून काही चुकू नये यासाठी आई- वडील तिची अधिक काळजी करायचे. नोकरी केल्याशिवाय घरची हलाखीची परिस्थिती बदलू शकणार नाही हे तिला ठाऊक होते. मात्र, आई-वडील आपल्याला नोकरी करू देतील की नाही? अशी शंका तिला होती. त्यामुळे सोमलीने १५ जूनला संध्याकाळी ४च्या सुमारास आई-वडिलांना उद्देशून चिट्ठी लिहिली आणि नोकरीसाठी घर सोडले. मुलीची चिठ्ठी वाचल्यावर आई-वडिलांनी छावणी पोलीस ठाणे गाठत सोमाली बेपत्ता असल्याची तक्रार दिली. सोमाली आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन छावणी पोलिसांनी केले आहे.

पोलिस उमेदवारांना 'मॅट'चा दिलासा

काय लिहिलं आहे चिट्ठीत...

मम्मी-पप्पा मी हे गाव आणि घर सोडून खूप लांब जॉबसाठी जात आहे. मी माझ्या जबाबदारीवर एकटी जाणार आहे. माझ्या सोबत कोणीही नाही. कारण आपल्या घरची परिस्थिती मी बघू शकत नाही. त्यामुळे मी स्वतः च्या करिअरसाठी आणि घरचं चांगलं व्हावं त्यासाठी जाणार आहे. कारण हे सगळं आता बघू शकत नाही. आणि मी जिथे जाईल तिथे खूप चांगली राहील. हे सगळे झाल्यावर तुम्ही कोणावरच केस करायची नाही. जे कोणी मला विचारेल त्या सगळ्यांना सांगायचं की जॉबसाठी बाहेरगावी गेली आहे म्हणून. आणि माझं टेन्शन घ्यायचं नाही. मी कोणताच वाईट काम करायला नाही चालले. मी चांगल्या कामासाठी बाहेर पडत आहे.

'घरगुती गॅसचा वाहनात वापर नको'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज