म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबईतल्या पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा 'एमआयएम' प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी ट्विटरवरून केली. त्यात आमदार वारिस पठाण यांच्यासह अन्य चौघांचा समावेश आहे.
विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत 'एमआयएम'ने औरंगाबाद मध्य आणि भायखळा या मतदारसंघातून विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद येथून खासदारकी जिंकली. वाढती ताकद लक्षात घेता पक्षाने विधानसभा निवडणुकासाठी दहा सप्टेंबरपासून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात पन्नास जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रमुखांनी मुंबईची तिसरी यादी स्वत: जाहीर केली. या यादीत भायखळा येथून वारिस पठाण, कुर्ला येथून रत्नाकर डावरे, वांद्रे पूर्वमधून मोहम्मद सलीम कुरेशी, अणुशक्तीनगर येथून सरफराज शेख यांना आणि अंधेरी पश्चिममधून आरेफ शेख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने आतापर्यंत १२ मतदार संघातून उमेवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे अॅड प्रकाश आंबेडर यांच्या 'वंचित बहुजन'सोबत होणारी आघाडी जवळपास फिस्कटल्यात जमा आहे.
\Bमुंबईतले उमेदवार
\B- भायखळा - वारिस पठाण
- कुर्ला - रत्नाकर डावरे
- अणुशक्तीनगर - सरफराज शेख
………- वांद्रे पूर्व - मोहम्मद कुरैशी
- अंधेरी पश्चिम - आरेफ शेख