अ‍ॅपशहर

​ सेलूच्या तहसीलसमोर अंत्यसंस्कार

परभणी: सेलू तालुक्यातील देवला येथील स्मशानभूमीच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यास जागा मालकाने विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतदेह घेऊन थेट सेलूचे तहसील कार्यालय गाठले. येथे तहसीलदारांना भेटीसाठी विनंती करूनही त्यांनी वेळ दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकरी आणि नातेवाईकांनी ‘त्या’ मृतदेहाला पोलिसांदेखत तहसील कार्यालयासमोर अग्नी दिला.

Maharashtra Times 20 Jul 2017, 3:14 am
परभणी: सेलू तालुक्यातील देवला येथील स्मशानभूमीच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यास जागा मालकाने विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतदेह घेऊन थेट सेलूचे तहसील कार्यालय गाठले. येथे तहसीलदारांना भेटीसाठी विनंती करूनही त्यांनी वेळ दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकरी आणि नातेवाईकांनी ‘त्या’ मृतदेहाला पोलिसांदेखत तहसील कार्यालयासमोर अग्नी दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम funeral in front of tehsil of selu
​ सेलूच्या तहसीलसमोर अंत्यसंस्कार

लोअर-दुधना प्रकल्पात जमिनी गेल्याने देवला या गावाचे सेलूजवळ पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या गावकऱ्यांनी स्मशानभूमीच्या जागेची मागणी लावून धरली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून एक जागा उपलब्ध करून दिली. मात्र, संबधीत जागामालकाने विविध पुरावे सादर करून विभागीय आयुक्तालयाकडून ही जागा स्मशानभुमीसाठी योग्य नसल्याबाबत निकाल आणला. यानंतर गावकऱ्यांनी स्मशानभुमीसाठी जागा मिळावी, यासाठी पाठपुरावा केला. याकडे राज्य सरकारनेही दुर्लक्षच केले.
सेलू तालुक्यातील देवला (पुनर्वसन) येथील आश्रोबा दगडोबा पंढेरे (वय ५५ ) यांचा बुधवारी मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी गावकरी नियोजीत स्मशानभूमीकडे गेले होते. मात्र, संबंधीत जागा मालकाने विरोध केला. त्यामुळे बुधवारी (१९ जुलै) येथील गावकऱ्यांनी तहसीलसमोर अंत्यविधी करून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. सेलूत नव्यानेच रूजू झालेले तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना हे प्रकरण व्यवस्थित हाताळता आले नाही. मृताच्या नातेवाईकांना दोन शब्दही बोलण्यास ते तयार नसल्याने तहसील कार्यालयासमोरच मृत आश्रोबा पंढेरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार तास मृतदेह तहसील कार्यालय समोर ठेवण्यात आला होते. यामुळे मृतदेहाची अवहेलना झाली असून जबाबदार असल्याने कठोर कारवाईची मागणी नातेवाईक व गावकऱ्यांनी केली.
दरम्यान, संबधीत जमीन मालकाला नगर पालिकेने खोटा अहवाल दिल्याचा आरोप होतोय. या भागात १२०० मीटर अंतरावर स्मशानभूमी आहे. मात्र, ती नसल्याचा अहवाल देणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाईची मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली. लोअर-दुधना प्रकल्पात जमीन, घर- दार सोडणाऱ्यांना अंत्यविधीसाठीही जागा उपलब्ध करून देवू शकत नाही, याबद्दल नागरिकातून संतप्त व्यक्त होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज