अ‍ॅपशहर

रिक्षात अवैधरित्या गॅस भरणारा गजआड

म टा प्रतिनिधी, औरंगाबादरिक्षामध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून एकास अटक केली...

Maharashtra Times 29 Jul 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिक्षामध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून एकास अटक केली. रमेश भानुदास वाघ उर्फ इम्रान भानुदास शेख यास न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पडेगाव परिसरातील कांसबीर दर्गा परिसरात रमेश भानुदास वाघ उर्फ इम्रान भानुदास शेख हा घरगुती गॅस अवैधरित्या रिक्षामध्ये भरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. या माहितीच्या अधारे पथकाने कारवाई करून रमेश वाघ यास अटक करून त्याच्या ताब्यातून सहा सिलेंडर, वजनकाटा, इलेक्ट्रीकल मोटर असे साहित्य जप्त केले. रमेश वाघ यास न्यायालया समोर हजर केले.न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत कोठडी सुनावली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज