औरंगाबाद: राम नवमीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेची साखळी चोराने लांबवली. ही घटना रविवारी (२५ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास समर्थनगर येथील राम मंदिरात घडली. सर्जुबाई मदनलाल धुत (वय ८५) रा. महावीरचौक, बाबा पेट्रोल पंपासमोर या राम नवमीनिमित्त कुटुंबासह गेल्या होत्या. दर्शन रांगेत उभ्या असताना त्यांची एक तोळ्याची सोन्याची साखळी चोरीस गेली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम मंदिरातून सोनसाखळी चोरी
राम नवमीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेची साखळी चोराने लांबवली. ही घटना रविवारी (२५ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास समर्थनगर येथील राम मंदिरात घडली.
Maharashtra Times 26 Mar 2018, 3:30 pm