अ‍ॅपशहर

भरधाव कारचा भीषण अपघात, ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू तर सरपंच गंभीर जखमी

मयत व जखमी हे दोघे चुलत भाऊ असून ते वाशिममधील जुमडा गावचे रहिवासी आहेत. नादेड येथून काम आटोपून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घतला.

Maharashtra Times 27 Oct 2021, 11:12 am
हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सेनगाव ते गोरेगाव या मार्गावर एका वळण रस्त्यावर एका भरधाव करचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ग्रामसेवक नितीन शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर सरपंच संदीप शिंदे हे गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hingoli car accident news


मिळालेल्या माहितीनुसार, MH 37 V 2397 असा अपघात झालेल्या कारचा नंबर आहे. जखमी संदीप शिंदे यांच्यावर सेनगाव येथे प्राथमिक उपचार करून हिंगोली येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. मयत व जखमी हे दोघे चुलत भाऊ असून ते वाशिममधील जुमडा गावचे रहिवासी आहेत. नादेड येथून काम आटोपून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घतला.

हा अपघात इतका भयंकर होता की कारचे चारही टायर वर झाले असून कार रस्त्याच्या काही अंतरावर जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून झालेल्या घटनेबद्दल अधिक तपास सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज