अ‍ॅपशहर

हाऊसिंग अदालत केवळ एकच तक्रार

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र यांच्या सूचनेनुसार शनिवारी औरंगाबागेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शनिवारी गृहनिर्माण तक्रार निवारण दरबार (हाऊसिंग अदालत) आयोजित करण्यात आला होता.

Maharashtra Times 18 Mar 2018, 4:03 pm
औरंगाबाद: सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र यांच्या सूचनेनुसार शनिवारी औरंगाबागेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शनिवारी गृहनिर्माण तक्रार निवारण दरबार (हाऊसिंग अदालत) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करूनही ठरलेल्या वेळेत केवळ एकच तक्रार प्राप्त झाली. जिल्हा उपनिबंधक एस. बी. खरे यांच्या कार्यालयात शनिवारी सकाळी साडेदहा ते दोन या काळात हाऊसिंग अदालतचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण - प्लॉट ओनर्स सभासदांच्या संस्थेसंबंधी या कार्यालयास प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या तक्रारीसंबंधी व शनिवारी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार होते. मात्र ठरलेल्या वेळेत केवळ एकच तक्रार आली ती सुद्धा पैठण तालुक्यातील होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम housing court only one complaint
हाऊसिंग अदालत केवळ एकच तक्रार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज