अ‍ॅपशहर

अनधिकृत लॅब बंद करा

रुग्णालयांमधील अनधिकृत लॅब बंद करा, रुग्णांना अनधिकृत लॅबमध्ये तपासण्यांसाठी पाठवू नका, अनधिकृत लॅबच्या रिपोर्टच्या आधारे रुग्णांवर उपचार करू नका. अशा गुन्ह्यांमध्ये डॉक्टरांना शिक्षा होत आहेत आणि अशांची नोंदणीदेखील रद्द केली जात आहे. अशा दोषी डॉक्टरांच्या पाठीशी संघटना अजिबात उभी राहणार नाही, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र 'आयएमए'ने सोमवारी (२२ जानेवारी) दिला.

Maharashtra Times 24 Jan 2018, 3:00 am
महाराष्ट्र 'आयएमए'ने दिला डॉक्टरांना इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lab


Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnirkheeMT
औरंगाबाद : रुग्णालयांमधील अनधिकृत लॅब बंद करा, रुग्णांना अनधिकृत लॅबमध्ये तपासण्यांसाठी पाठवू नका, अनधिकृत लॅबच्या रिपोर्टच्या आधारे रुग्णांवर उपचार करू नका. अशा गुन्ह्यांमध्ये डॉक्टरांना शिक्षा होत आहेत आणि अशांची नोंदणीदेखील रद्द केली जात आहे. अशा दोषी डॉक्टरांच्या पाठीशी संघटना अजिबात उभी राहणार नाही, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र 'आयएमए'ने सोमवारी (२२ जानेवारी) दिला.

पॅथॉलॉजी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पॅथॉलॉजिस्टलाच रिपोर्ट देण्याचा अधिकार असल्याचे शिक्कामोर्तब सर्वोच्च न्याचालयाने १२ डिसेंबर २०१७ रोजी केले आहे. त्यामुळे पॅथॉलॉजिस्टशिवाय चालणाऱ्या सर्व लॅब या अनधिकृत ठरल्या आहेत. याचा संदर्भ देत राज्य 'आयएमए'ने वेगवेगळ्या बाबींकडे डॉक्टरांचे गांभीर्याने लक्ष वेधले आहे. अनधिकृत लॅबच्या रिपोर्टवरून उपचार करताना गुंतागुंत निर्माण झाल्यास न्यायालय डॉक्टरांना दोषी ठरवू शकते व डॉक्टरांना शिक्षा होऊ शकते. अनधिकृत लॅबचे रिपोर्ट हे विम्याच्या दाव्याला पात्र ठरत नाहीत. असा रुग्ण ग्राहक मंचामध्ये गेल्यास लॅब चालवणारा तंत्रज्ञ व रुग्णाला अनधिकृत लॅबमध्ये पाठवणाऱ्या डॉक्टरकडून नुकसान भरपाई वसूल केली जाऊ शकते. रुग्णालयामध्ये तंत्रज्ञांमार्फत लॅब चालवणाऱ्या परभणीतील एमबीबीएस डॉक्टरला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा अलीकडेच झाली आहे. त्याचवेळी पॅथॉलॉजिस्ट हा एकाचवेळी अनेक लॅबमध्ये काम करू शकत नाही, रिपोर्ट देऊ शकत नाही, याकडेही 'आयएमए'ने डॉक्टरांचे लक्ष वेधले आहे. या प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यांमध्ये संघटना दोषी डॉक्टरांच्या पाठीशी उभी राहणार नाही, असेही संघटनेचे राज्य सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी पत्रात नमूद केले आहे.

३६ जिल्हाधिकारी, २८ आयुक्तांना पत्र

यासंदर्भात राज्यातील ३६ जिल्हाधिकारी व २८ पालिका आयुक्तांना 'महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट'ने पत्र दिले असून, त्या त्या कार्यक्षेत्रातील सर्व लॅबचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करावी, प्रयोगशाळांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी व अनधिकृत प्रयोगशाळांवर कारवाई करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज