औरंगाबाद : दंगलीप्रकरणातील आरोपी असणारा युवा सेनेचा पदाधिकारी आणि शिवाजीनगर भागाचा नगरसेवक राजेंद्र जंजाळ याला छातीत दुखत असल्यामुळे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दंगल प्रकरणात जंजाळ याच्यावर दुकाने जाळण्याचा आरोप असून त्या प्रकरणात कोर्टाच्या आदेशामुळे त्याची सध्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी जंजाळच्या छातीत दुखत असल्याने त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जंजाळ घाटीत दाखल
दंगलीप्रकरणातील आरोपी असणारा युवा सेनेचा पदाधिकारी आणि शिवाजीनगर भागाचा नगरसेवक राजेंद्र जंजाळ याला छातीत दुखत असल्यामुळे घाटी रुग्णालयात दाखल ...
Maharashtra Times 27 May 2018, 4:00 am