अ‍ॅपशहर

इंडिगो विमानाच्या औरंगाबादहून फेऱ्या बंद

शिर्डी येथील विमाने औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात येत होते. स्पाइस जेट कंपनीची आठ आणि इंडिगो एअर लाइन्सची दोन विमाने औरंगाबादेत येत होती. इंडिगो एअरलाइन्सच्या दोन्ही विमानांची औरंगाबादहून प्रवासी वाहतूक सोमवारी (१६ डिसेंबर) बंद करण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स 17 Dec 2019, 8:58 am
औरंगाबाद : शिर्डी येथील विमाने औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात येत होते. स्पाइस जेट कंपनीची आठ आणि इंडिगो एअर लाइन्सची दोन विमाने औरंगाबादेत येत होती. इंडिगो एअरलाइन्सच्या दोन्ही विमानांची औरंगाबादहून प्रवासी वाहतूक सोमवारी (१६ डिसेंबर) बंद करण्यात आली. औरंगाबाद विमानतळावरून नियमित उड्डाण करणारे विमान राहिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indgo


२५ नोव्हेंबरपासून औरंगाबाद विमानतळावर शिर्डीला जाणारे विमानांचे आगमन सुरू झाले होते. या विमानसेवेमुळे औरंगाबाद विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली होती. स्पाइस जेट आणि इंडिगो एअरलाइन्स या दोन विमान कंपन्यांचे विमाने औरंगाबादला उतरविण्यात आली होती. स्पाइस जेटचे विमाने शिर्डीला परत दहा डिसेंबर रोजी गेले आहे. १५ डिसेंबरला विमानतळावर शिर्डीच्या विमानाचे अखेरची फेरी होती. १६ डिसेंबरपासून इंडिगोचे विमान थेट शिर्डीला उतरविण्यात आले आहे. यामुळे औरंगाबाद विमानतळावर प्रवाशांची आणि विमानांची झालेली लगबग कमी झालेली आहे, मात्र नियमित विमानाचा प्रवास औरंगाबाद विमानतळावरून सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज