अ‍ॅपशहर

जगन्नाथ रथयात्रेनिमित्त इस्कॉनतर्फे ‘बाइक रॅली’

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) संस्थापकाचार्य ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी (२२ जानेवारी) बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रथयात्रा महोत्सव येत्या २९ जानेवारी रविवारी होत आहे.

Maharashtra Times 24 Jan 2017, 3:00 am
औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) संस्थापकाचार्य ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी (२२ जानेवारी) बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रथयात्रा महोत्सव येत्या २९ जानेवारी रविवारी होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम iscon rally
जगन्नाथ रथयात्रेनिमित्त इस्कॉनतर्फे ‘बाइक रॅली’

बाइक रॅलीला आर. एल. गुप्ता, डॉ. सुशीला भारुका, डॉ. रोहिणी प्र‌िय प्रभू (अध्यक्ष इस्कॉन, औरंगाबाद) यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. एन-१ सिडको, राधाकृष्ण मंदिर येथुन रॅलीला सुरुवात झाली. प्रोझोन मॉल, मुकुंदवाडी, अमरप्रीत चौक, रोपळेकर चौक, खिवंसरा पार्क, चेतक घोडा चौक, त्रिमूर्ती चौक, गजानन महाराज मंदिर, रिलायन्स मॉल, हिंदूराष्ट्र चौक, पुंडलिक नगर, कामगार चौकमार्गे छत्रपती कॉलेज येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीत १६५ जणांनी सहभाग नोंदवला. रॅलीदरम्यान ‘हरे कृष्ण हरे कृष्ण- कृष्णा कृष्णा, हरे हरे ; हरे रामा हरे रामा रामा रामा हरेहरे’चा जयघोष करण्यात आला. सुरेंद्र कुलकर्णी यांनी जलपानाची सोय केली, कसबेकर तेल भांडार त्रिमूर्ती चौक येथे रॅलीचे स्वागत करण्यात आले. २९ रोजी होत असलेल्या जगन्नाथ रथयात्रेत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीकांत जोगदंड यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज