अ‍ॅपशहर

आयटीआयचे सुधारित वेळापत्रक जाहीर

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेशासाठीचे सुधारित वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे जाहीर करण्यात आले. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ जूनपासून सुरू होणार आहे. १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.

Maharashtra Times 23 Jun 2016, 3:00 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम iti time table
आयटीआयचे सुधारित वेळापत्रक जाहीर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेशासाठीचे सुधारित वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे जाहीर करण्यात आले. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ जूनपासून सुरू होणार आहे. १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.
प्रारंभी १५ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, ऐनवेळी वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. नवे वेळापत्रक केव्हा जाहीर होणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. बुधवारी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २७ जून ते १० जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज व निश्चितीसाठी २७ ते ११ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यंदा प्रवेशाच्या सहा फेऱ्या होणार आहेत. मराठवाड्यात ८२ शासकीय आणि ३६ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. एक व दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या १८ हजार १७ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. ज्यामध्ये दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमाचे ३६९ युनिट असून त्याची प्रवेश क्षमता ७ हजार ८६४ एवढी आहे. एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रमाचे ४४३ युनिट असून त्यामध्ये १० हजार १५३ प्रवेश क्षमता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज