अ‍ॅपशहर

जळगाव- औरंगाबाद शिवशाही बस झाली सुरू

औरंगाबाद-जळगाव मार्गावर शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक तासाला शिवशाही बस सुरू झाल्याने प्रवाशांना वातानुकूलित प्रवास होणार आहे. औरंगाबाद विभागाला आतापर्यत १६ शिवशाही बस मिळाल्या आहेत.

Maharashtra Times 13 Mar 2018, 4:07 am

औरंगाबाद :

महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgoan aurangabad shivshahi bus is underway
जळगाव- औरंगाबाद शिवशाही बस झाली सुरू


औरंगाबाद-जळगाव मार्गावर शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक तासाला शिवशाही बस सुरू झाल्याने प्रवाशांना वातानुकूलित प्रवास होणार आहे. औरंगाबाद विभागाला आतापर्यत १६ शिवशाही बस मिळाल्या आहेत. यात औरंगाबाद-मुंबई, औरंगाबाद-नागपूर, औरंगाबाद-नाशिक तसेच औरंगाबाद-चंद्रपूर अशा मार्गावर या शिवशाही बस सुरू आहेत. या बससेवेला मिळालेल्या प्रतिसादानंतर अन्य मार्गावरही शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद-जळगाव आणि भुसावळ मार्गावरही शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार तीन बस जळगावहून तर तीन बस औरंगाबादहून सोडण्यात आल्या आहेत. जळगावला जाणारी पहिली बस दररोज पहाटे ५.१५ वाजता निघणार आहे. दर तासाला शिवशाही सोडण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज