अ‍ॅपशहर

Corona: करोना रुग्ण वाढल्यानं औरंगाबादमध्ये सोमवारपासून लॉकडाऊन

Aurangabad Lockdown: करोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्यानं औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावले जाणार आहे. दहा दिवसांसाठी हे लॉकडाऊन असेल.

Authored byउन्मेष देशपांडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2021, 4:42 pm

हायलाइट्स:

  • औरंगाबादमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढली
  • औरंगाबाद शहर व जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
  • औरंगाबाद शहरात सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Lockdown
औरंगाबाद: औरंगाबाद शहरात पुढील आठवड्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हे लॉकडाऊन दहा दिवसांचे असेल, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सोमवार ते बुधवार दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून हे लॉकडाऊन १८ किंवा २० मार्चपर्यंत लागू असेल.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. पाच दिवसांपासून तर रोज तीनशे पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर रुग्ण वाढ रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बाजारपेठेतील गर्दी, करोना बाबतच्या नियमांचे पालन करण्यात होत असलेले दुर्लक्ष या बाबी रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरू लागल्या आहेत. मास्कचा वापर करा असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात असतानाही अनेक नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनाने ७ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या नंतर देखील रुग्णवाढीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

वाचा: मोठा निर्णय! नागपूर झेडपीतील OBC जागांवरील निवडणूक रद्द

रुग्ण संख्येचा वाढता आलेख लक्षात घेता पत्रकारांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना लॉकडाऊन बद्दल विचारले असता त्यांनी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, असे सांगितले होते. सलग आठ दिवस रोज तीनशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले होते. ज्या भागात जास्त रुग्ण किंवा ज्या भागात जास्त गर्दी, त्या भागात लॉकडाऊन लावू, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

वाचा: नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा: पुणे पोलिसांचे छापे, आरोपींची पळापळ

दरम्यान, शनिवारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढील आठवड्यापासून दहा दिवसांसाठी संपूर्ण औरंगाबाद शहरात लॉकडाऊन पुकारण्यात येणार असल्याचे सांगितले. लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासक यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन कोणत्या दिवसापासून लागू करायचा याचा निर्णय होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ते १० मार्चच्या दरम्यान प्रशासन लॉकडाऊन लावू शकते. १८ किंवा २० मार्च पर्यंत हे लॉकडाऊन असेल.

वाचा: आधी वडील आणि आजोबांचा खून केला, मग तरुणाने...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज