अ‍ॅपशहर

आधी हॉटेल सील, आता प्रशासनाकडून प्रसिद्ध कापड दुकानाला टाळं, कोरोना नियम तोडणं भोवलं!

कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शहरातील एका मोठ्या आणि प्रसिद्ध अशा कापड दुकानावर औरंगाबाद महानगर पालिका आणि कामगार विभागाने संयुक्त कारवाई केली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 13 Jan 2022, 4:33 pm
औरंगाबाद : कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शहरातील एका मोठ्या आणि प्रसिद्ध अशा कापड दुकानावर औरंगाबाद महानगर पालिका आणि कामगार विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. यावेळी कारवाईसाठी आलेल्या पथकाने दुकान सील केलं असून, पुढील आदेशापर्यंत हे दुकान बंद राहणार असल्याची माहिती कारवाईसाठी आलेल्या अधिकार्‍यांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Aurangabad mahapalika Action taken Against Cloth Shop For Violating Corona Rules


अधिक माहिती अशी की, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील आकाशवाणी चौकातील नामांकित राज क्लॉथ स्टोरवर महानगरपालिकेकडून आज (गुरुवार) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे. यावेळी एका कर्मचाऱ्याने मास्क लावलेले नव्हते तर, दुसऱ्या कर्मचाऱ्याने लसीचा दुसरा डोस घेतला नव्हता. त्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत हे दुकान पथकाकडून सील करण्यात आलं आहे. मनपाच्या या कारवाईने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

यापूर्वी हॉटेलवर केली होती कारवाई....

यापूर्वी सुद्धा अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील नामांकित हॉटेल असलेल्या भोज रेस्टॉरंटवर कारवाई केली होती. यावेळी ५० % ग्राहकांना परवानगी असतानासुद्धा त्यापेक्षा कितीतरी पटाने ग्राहक रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होते. तर अनेक कर्मचाऱ्यांनी मास्क सुद्धा लावलेले नव्हते. त्यामुळे कोरोना नियम तोडणाऱ्या या हॉटेलला सील केले होते. त्यानंतर १५ हजारांच दंड देऊन हॉटेल सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज