अ‍ॅपशहर

ठाकरे सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात अखेर MIM रस्त्यावर, विनोद पाटलांचाही पाठिंबा

ठाकरे सरकारने किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीच्या विरोधात औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात आज एमआयएम पक्षाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी एमआयएम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुद्धा केली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 3 Feb 2022, 9:24 pm
औरंगाबाद : ठाकरे सरकारने किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीच्या विरोधात औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात आज एमआयएम पक्षाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी एमआयएम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुद्धा केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra aurangabad mim protest against thackeray government over maharashtra wine liquor policy


राज्यात यापुढे एका हजार स्क्वेअर फूटपेक्षा अधिक असलेल्या किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करता येणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानंतर या निर्णयाला विरोधकांकडून विरोध करण्यात येत आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी किराणा दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये वाईन सुरू झाल्यास त्या फोडण्याचा इशारा दिला होता.

जलील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आज (गुरुवार) सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत, कायदेशीर कारवाई करून नंतर सोडून दिले.

विनोद पाटलांचा पाठिंबा

एमआयएम पक्षाकडून वाईनच्या निर्णयाविरोधात क्रांती चौकात धरणे आंदोलन सुरू असतानाच, यावेळी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले. तर खुलेआम वाईन विक्रीच्या विरोधात एमआयएम पक्षाची भूमिका योग्य असून, त्यांना समर्थन देण्यासाठीच आम्ही येथो आलो असल्याचं पाटील 'महाराष्ट्र टाइम्स'ला बोलताना सांगितलं.

ठाकरे सरकारचा निर्णय काय?

ठाकरे सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन (wine) विक्रीला परवानगी दिली आहे. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यातील किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये दारु मिळताना दिसणार आहे. सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉप या पद्धतीने वाईनची विक्री संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते. त्यांच्या प्रोडक्ट्सला चालना देण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. सुपरमार्केटमध्ये एक स्टॉल म्हणजे एक शोकेस निर्माण करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज