अ‍ॅपशहर

रगडेंच्या सांचीवर लंडनच्या एडवर्डचं 'लव्ह', औरंगाबादेत थाटात लग्न, मिस्टर क्लेश म्हणाले...

Indian Girl Marries London Boy : औरंगाबादच्या सांचीच्या प्रेमात एडवर्ड पडला. २०१९ पासून दोघे इंग्लंडमध्ये एकत्र होते. दोघांनीही लग्न करण्याचे ठरवले. दोघांनीही घरच्यांना सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2023, 8:49 pm
औरंगाबाद : इंग्लंडचा एडवर्ड औरंगाबादच्या सांचीच्या प्रेमात पडला. दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीनं हा विवाह सोहळा गुरुवारी औरंगाबादेत पार पडला. या आगळ्या वेगळ्या लग्नाची शहरात जोरदार चर्चा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aurangabad Sanchi Ragade Wedding England London Edward
औरंगाबादच्या सांचीचे लंडनच्या एडवर्डशी लग्न


मुलगी महाराष्ट्रीय, तर मुलगा थेट इंग्लंडचा. त्यामुळे चर्चा तर होणारच. विशेष म्हणजे दोघांचं लग्न भारतीय पद्धतीने झालं. इंग्लंडचं क्लेश कुटुंबीय अगदी भारतीय वेश परिधान करुन लग्नात सहभागी झालं आणि भारतीय गाण्यावर थिरकलंही.

औरंगाबादच्या सांचीच्या प्रेमात एडवर्ड पडला. २०१९ पासून इंग्लंडमध्ये दोघे सोबत होते. दोघांनीही लग्न करण्याचे ठरविले. दोघांनीही घरच्यांना सांगितले. विशेष म्हणजे दोघांच्या कुटुंबाने ते मान्य करीत लग्नाला होकार दिला. यानंतर भारतीय पद्धतीने औरंगाबादमध्ये लग्न करण्याचं ठरले.

एडवर्ड आणि रगडे कुटुंबीयाने एकत्र येत शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्न पार पाडलं. भारतीय बौद्ध पद्धतीने दोघांचं लग्न झालं. वरात देखील निघाली आणि वरातीत एडवर्डच्या संपूर्ण कुटुंबाने भारतीय गाण्यावर ठेका धरला होता.

ब्रिटनमध्ये लग्न म्हणजे एका तासाचे काम असते मात्र भारतात लग्न म्हणजे चार दिवसांचा सोहळा आहे. हे सगळं आनंदादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळेस एडवर्डच्या वडिलांनी दिलीय. तर त्याच्या बहिणीने सुद्धा भारतीय पद्धतीने लग्न असल्याने आनंद होत असल्याचं सांगितलं.

हेही वाचा : गर्लफ्रेण्ड दुसऱ्या पोराबरोबर दिसली, मुंबईकर तरुणाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात सगळं संपवलं

जातीपातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा खास आनंद असल्याचं मुलीच्या वडिलांनी सांगितलंय. सांची आता कायमची सातासमुद्राच्या पार राहायला जाणार याचं दुःख आहे. मात्र मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळेस रगडे कुटुंबियांनी दिली. या लग्नाची मात्र शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : त्याची चिता जळत असतानाच वाईट बातमी धडकली, गावातल्याच आणखी तिघांचा अपघातात मृत्यू

महत्वाचे लेख