अ‍ॅपशहर

१ कोटीचं टार्गेट पण लाखभर सदस्य होताहोता दमछाक, तरीही काँग्रेसचा स्वबळाचा नारा!

काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेवार यांनी आपल्या भाषणातून औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीचे आकडे जाहीर करुन सगळी पोलखोल केली. तर जिल्ह्यात चार महिन्यात फक्त १९८३ नवीन सदस्यांची नोंद झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 2 Mar 2022, 3:37 pm
औरंगाबाद: शहरातील चिखलठाणा परिसरात मंगळवारी झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्ते मेळाव्यात डिजिटल सदस्य नोंदणीवर भर देण्याचं आवाहन पक्षातील जेष्ठ नेत्यांनी केली. मात्र याचवेळी सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेवार यांनी आपल्या भाषणातून औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीचे आकडे जाहीर करुन सगळी पोलखोल केली. तर जिल्ह्यात चार महिन्यात फक्त १९८३ नवीन सदस्यांची नोंद झाली असल्याचं सुद्धा मुत्तेवार म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Congress digital member registration Aurangabad melava ralley
अमित देशमुख (मंत्री, महाराष्ट्र राज्य)


गेल्या चार महिन्यांत औरंगाबाद पूर्वमध्ये २९८, पश्चिममध्ये ६७, सिल्लोड १०, गंगापूर ४४२, फुलंब्री ६८०, पैठण २१६, कन्नड २३१ अशी नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक एक कोटींची नोंदणी करण्याच्या सूचना आहेत. पण एक लाखाचाही आकडा गाठलेला नाही. उलट तेलंगणात ३० लाख नोंदले गेले, असं म्हणत मुत्तेवार यांनी सदस्य नोंदणीची पोलखोल केली.

तरीही स्वबळाचा नारा...

यावेळी माध्यमांशी बोलताना कॅबिनेट मंत्री तथा अमित देशमुख म्हणाले की, आगामी स्थानिक निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. पण एकीकडे एक कोटींचे उद्दिष्ट असताना फक्त १ लाख सदस्य नोंदणी झाली असताना देशमुख यांच्या स्वबळाच्या नाऱ्याची मोठी चर्चा पाहायला मिळाली.

....तरच काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार!

यापुढे काँग्रेस पक्षातून उमेदवारी हवी असेल तर 'डिजीटल सदस्य नोंदणी' अनिवार्य असणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते तथा माहिती वैद्यकीय शिक्षण आणि वैदयकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा विभागीय पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

३१ मार्चपर्यंत काँग्रेसची डिजीटल सदस्य नोंदणी सुरु आहे. डिजीटल सदस्य नोंदणी केल्यानंतर कार्यकर्त्यांनाही सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधता येणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील प्रत्येकाने डिजीटल नोंदणी करावी. तसेच यापुढे उमेदवारी देतांना सुद्धा डिजिटल नोंदणीचा विचार केला जाणार असून, ज्यांनी डिजीटल सदस्य नोंदणी केली नाही, त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असंही देशमुख म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज