अ‍ॅपशहर

मैत्रिणीचा विवाह ठरल्याचा राग, मित्राचा लग्नासाठी तगादा, 'ते' फोटो नवऱ्याला दाखवण्याची धमकी

Crime News : बीएस्सीचे शिक्षण घेत असताना दोघा जणांची ओळख झाली. दरम्यान दोघांनी सोबत फोटो काढले. मात्र तरुणीचे लग्न जमले, ही बाब तरुणाच्या जिव्हारी लागली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2022, 10:21 am
औरंगाबाद : महाविद्यालयीन शिक्षण घेताना ओळख झाली, दोघांनी सोबत फोटोही काढले, मात्र तरुणीचं लग्न जमल्याची गोष्ट तरुणाला रुचली नाही. त्याने तिच्यामागे लग्न करण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. मात्र तरुणीने नकार देताच तरुण चिडला. त्याने तिला थेट जीवे ठार मारण्याचीच धमकी दिली. इतकंच नाही, तर तिचे फोटोही होणाऱ्या नवऱ्याला दाखवण्याचं ब्लॅकमेलिंग केलं. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Blackmail
औरंगाबाद


बीएस्सीचे शिक्षण घेत असताना दोघा जणांची ओळख झाली. दरम्यान दोघांनी सोबत फोटो काढले. मात्र तरुणीचे लग्न जमले, ही बाब तरुणाच्या जिव्हारी लागली आणि त्याने लग्नासाठी तिच्यामागे तगादा लावण्यास सुरुवात केली.

पीडित तरुणीने आरोपीला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. याचा त्याला भलताच राग आला. कारण आरोपीने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर सोबत काढलेले फोटो भावी पतीला दाखवण्याचीही धमकी दिली. या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव उत्तम राऊत (रा. वानखेडेनगर, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी व पीडितेची बीएस्स्सीचे शिक्षण घेत असताना ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर कालांतराने मैत्रीत झाले होते. या दरम्यान आरोपी व पीडितेने सोबत फोटो काढले होते. ते फोटे त्याने सांभाळून ठेवले होते. मात्र अलिकडच्या काळात लग्न जमल्यामुळे पीडितेने आरोपीपासून दूर राहण्यास सुरुवात केली होती.

दुसरीकडे, आरोपी हा पीडितेकडे लग्नासाठी मागे लागला होता. परंतु पीडितेने लग्नासाठी वैभवला नकार दिला होता. या नंतर आरोपीने सतत पाठलाग करणे, फोनवरुन संपर्क करणे सुरु केले. आरोपीने तिच्या बहिणीला देखील मध्यस्थी केली होती.

हेही वाचा : अरेरे! तहान लागताच बाटली तोंडाला लावली; वडिलांची चूक दीड वर्षांच्या लेकराच्या जीवावर बेतली

दरम्यानच्या काळात माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा पीडितेसह तिच्या भावाला मारण्याची धमकी दिली. शिवाय भावी पतीला दोघांचे काढलेले फोटो पाठवण्याची धमकीही तो देत होता.

घाबरलेल्या तरुणीने औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. तरुणीच्या तक्रारीवरून विविध कलमांखाली सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार हे करत आहेत.

हेही वाचा : मरीन ड्राइव्ह, हाजी अली मुंबईच्या नकाशावरुन गायब होणार; किनाऱ्यालगतची शहरं गिळणार समुद्र

महत्वाचे लेख