अ‍ॅपशहर

Breaking : राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी मोठी कारवाई, मनसे जिल्हाध्यक्षांना अचानक पदावरून काढलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई केली आहे. यामुळे संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 14 Dec 2021, 1:33 pm
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई केली आहे. यामुळे संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांचे तडकाफडकी पद काढण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यातच ही कारवाई झाल्याने दशरथे समर्थकांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj Thackeray live
Breaking : राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी मोठी कारवाई, मनसे जिल्हाध्यक्षांना अचानक पदावरून काढले


कोण आहेत दशरथे ?

सुहास दशरथे शिवसेनेत असताना अनेक दिवस त्यांना पक्षात महत्व दिले जात नसल्याने त्यांनी शिवसेना सोडून मनसेत जाण्याचा निर्णय घेतला. मनसेत आल्यावर सुद्धा त्यांना पक्षात हवं तसे महत्व मिळत नव्हते. तसेच पक्षातील गटबाजीमुळे गेली काही दिवस शहारत मनसे वाद पाहायला मिळत होता. त्यातच राज ठाकरे यांच्या दौऱ्यात दशरथे यांची हकालपट्टी आता चर्चेचा विषय बनला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज