औरंगाबाद: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी किरण साळुंके, तर सचिवपदी अनंत डी. गाडेकर यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी संजीवनी घाटे, उपसचिवपदी काकासाहेब जाधव, कोषाध्यक्षपदी आशिष राजकार, ग्रंथपाल सचिवपदी संदिप कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे सदस्यपदी प्रीती वानखेडे, विद्या टाकसाळ, विवेक पिंगळे, जयंत देशमुख, सुचिता धोंगडे, एम. आर. कुलकर्णी, एस. बी. मेणे आणि माधव पी. गुडे यांची निवड झाली आहे.
मॅट वकील संघ; अध्यक्षपदी साळुंके
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी किरण साळुंके, तर सचिवपदी अनंत डी गाडेकर यांची निवड झाली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2019, 4:00 am