अ‍ॅपशहर

पालिकेने नाही तर, एमआयडीसीने दिले पाणी

विमानतळ प्राधिकरण २००७ पासून पाणी देण्याची मागणी महापालिकेकडे वारंवार करीत होते. ती १२ वर्षांत पालिकेने पूर्ण केली नाही. प्राधिकरणाने २०१९मध्ये 'एमआयडीसी'कडे अर्ज केला.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 11 Jun 2021, 6:05 pm
औरंगाबाद : विमानतळ प्राधिकरण २००७ पासून पाणी देण्याची मागणी महापालिकेकडे वारंवार करीत होते. ती १२ वर्षांत पालिकेने पूर्ण केली नाही. प्राधिकरणाने २०१९मध्ये 'एमआयडीसी'कडे अर्ज केला. त्यांनी पाठपुरावा करून दोन वर्षांत विमानतळाची तहान भागविली, असे गौरवोद्गार गुरुवारी विमानतळावर झालेल्या जलपूजन सोहळ्यात काढण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम midc has given water to aurangabad airport authority
पालिकेने नाही तर, एमआयडीसीने दिले पाणी


चिकलठाणा येथील विमानतळाला एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा करण्यात आला. विमानतळावरील एटीएस संकुल परिसरात गुरुवारी जलपूजन झाले. विमानतळ निर्देशक डी़ जी़ साळवे, सहायक प्रबंधक सुधीर जगदाळे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, एमआयडीसीचे निवृत्त उपअभियंता दिलीप परळीकर, उपअभियंता गणेश मोईकर, सहायक अभियंता प्रशांत सरग, व्ही. ए. बनसोडे, शारदा इन्फोटेकचे निखिल कुलकर्णी उपस्थित होते.

शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला, बारा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. प्राधिकरणाने महापालिकेकडे चार इंच जलवाहिनी जोडण्याची मागणी केली होती़ त्यांची १,७०,०० लिटर पाण्याची मागणी होती. त्यानंतर साळवे यांनी १२ जून २०१९ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंत्यांकडे चार इंच व्यासाची वाहिनी टाकण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला होता़ त्यानंतर हर्षे यांनी १५ जुलै २०१९ मध्ये या योजनेच्या कार्यान्वयासाठी लागणाऱ्या सर्व अटी, नियमांसह दोन्ही विभागाच्या वरिष्ठ कार्यालयांकडून घेण्यात येणाऱ्या परवानग्या व २३७. ५६ लाख रूपयांचे अंदाजपत्रक दिले होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने या प्रस्तावास अनुमोदन देऊन, ९ ऑक्टोबर २०२० मध्ये सहमती करार केल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या कामासाठी विशेष परिश्रम घेतलेले सहायक अभियंता प्रशांत सरग, बनसोडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन या सोहळ्यात सत्कारही करण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज