वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीतील एका खासगी कंपनी जवळील उद्यानात रांजणगाव शेणपूंजी येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीवर सोमवारी दुपारी बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आकाश देवीदास वाघमारे (रा. रांजणगाव शेणपूंजी ता. गंगापूर) याने दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून खासगी कंपनीच्या जवळील उद्यानात घेऊन गेला. तिला धमकावत अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडित मुलीने बुधवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक सविता तांबे या करित आहेत.
अल्पवयीन मुलीवर वाळूजमध्ये बलात्कार
वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीतील एका खासगी कंपनी जवळील उद्यानात रांजणगाव शेणपूंजी येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीवर सोमवारी दुपारी बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Maharashtra Times 15 Feb 2018, 12:35 pm