अ‍ॅपशहर

मोबाइल हँडसेट परीक्षणासाठी पाठवला

पाच वर्षांपूर्वी शहरात झालेल्या श्रुती भागवत खून प्रकरणात श्रुती यांचा मोबाइल हँडसेट पुन्हा परीक्षणासाठी मुंबईच्या न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेला पाठविण्यात आला आहे. ही माहिती सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक आय. एन. पठाण यांनी अहवालाद्वारे औरंगाबाद खंडपीठात दिली.

Maharashtra Times 11 Oct 2017, 3:00 am
मोबाइल हँडसेट परीक्षणासाठी पाठवला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mobile handset sent for review
मोबाइल हँडसेट परीक्षणासाठी पाठवला

तपास अधिकाऱ्यांचा खंडपीठात अहवाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
पाच वर्षांपूर्वी शहरात झालेल्या श्रुती भागवत खून प्रकरणात श्रुती यांचा मोबाइल हँडसेट पुन्हा परीक्षणासाठी मुंबईच्या न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेला पाठविण्यात आला आहे. ही माहिती सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक आय. एन. पठाण यांनी अहवालाद्वारे औरंगाबाद खंडपीठात दिली.
उल्कानगरी या उच्चभ्रू वसाहतीमध्ये रहिवासी असलेल्या श्रुती विजय भागवत यांचा १७ एप्रिल २०१२ रोजी मध्यरात्रीनंतर अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला. या खुनाचा तपास लागत नाही म्हणून श्रुती भागवत यांचे बंधू मुकूल करंदीकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी मंगळवारी न्या. संभाजी शिंदे व न्या. मंगेश पाटील यांच्यासमोर झाली. तपास अधिकारी आय. एन. पठाण यांनी खंडपीठाच्या आदेशानुसार दहा पानी तपास अहवाल सादर केला. या अहवालावर कोर्टाने समाधान व्यक्त केले आणि हा तपास पुढे चालू ठेवा, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत. श्रुती भागवत यांच्या पाठविण्यात आलेल्या मोबाइल हँडसेटचे परीक्षण केले जाणार आहे. त्यांच्या मोबाइलमधून डिलीट केलेल्या एसएमएसविषयी माहिती प्राप्त होईल. त्याचा अभ्यास करून तपास केला जाईल, असे या अहवालात म्हटले आहे. हा गुन्हा घडून पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झाला आहे. त्याचा विचार करता त्या भागात राहणारे आणि सध्या रहात असलेल्या व्यक्तींना विश्वासात घेऊन अधिक तपास करावयाचा आहे, असे पठाण यांनी या अहवालात म्हटले आहे. फिंगर प्रिंट, डीएनए अहवाल यासंबंधी तज्ज्ञांना समक्ष भेटून आणि चर्चा करून त्या अनुषंगाने तपास करणे आहे. हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार किंवा हत्या करण्याची सुपारी घेऊन झाला आहे का, यादृष्टीने तपास करावयाचा आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. सद्यस्थितीत गुन्हा उघडकीस येण्याइतपत उपयुक्त माहिती प्राप्त झालेली नाही, असेही पठाण यांनी या अहवालात म्हटले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने मोबाइलमधील अधिक माहिती प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे, असे सहाय्यक सरकारी वकील प्रीती डिग्गीकर यांनी सांगितले.
तपास अधिकाऱ्यांनी दाखल केलेला तपास अहवाल मिळाला आहे. त्यात नेमके काय म्हटले आहे, यावर अभ्यास करावयाचा आहे. सध्यातरी या अहवालावर समाधानी असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अभयसिंह भोसले यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज