अ‍ॅपशहर

​ विष्णुपूरी प्रकल्पाचे गेट उघडले

नांदेड शहर व जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या घरातील साचलेले पावसाचे पाणी विद्युत मोटारीने त्वरेने काढण्यात आले. परंतु सर्वसामान्यांच्या घरात घुसणारे पाणी मात्र उशिरापर्यंत निघाले नव्हते. दरम्यान विष्णुपूरी सिंचन प्रकल्पातील पाणी साठा ७२ टक्क्यांपर्यंत आला आहे. विष्णुपूरी प्रकल्पाचे एक गेट दुपारी उघडण्यात आले असून नारिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Times 22 Aug 2017, 3:19 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nanded heavy rain
​ विष्णुपूरी प्रकल्पाचे गेट उघडले

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नांदेड शहर व जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या घरातील साचलेले पावसाचे पाणी विद्युत मोटारीने त्वरेने काढण्यात आले. परंतु सर्वसामान्यांच्या घरात घुसणारे पाणी मात्र उशिरापर्यंत निघाले नव्हते. दरम्यान विष्णुपूरी सिंचन प्रकल्पातील पाणी साठा ७२ टक्क्यांपर्यंत आला आहे. विष्णुपूरी प्रकल्पाचे एक गेट दुपारी उघडण्यात आले असून नारिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
येथील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी पातळी २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता ३५४ मीटर होती. प्रकल्पातील पाणीसाठा ६५.२५ दशलक्ष घनमीटर असून प्रकल्पात ८१ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पात पाण्याचा येवा वाढत असल्याने आवश्यकतेनुसार वेळोवळी प्रकल्पाचे गेट उघडावी लागतील. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी सर्तकता बाळगावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
रविवारचा दिवस हा पावसाचाच दिवस ठरला. पहाटे पासूनच पाऊस सुरू होता. शहरातल अनेक सखल भागात पाणी पाणी झाले होते. अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराचे पितळ उघडले पडले आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नाल्या साफसफाईच्या कामावर ३५ लाख रुपये खर्च केले. परंतु हा खर्च निव्वळ पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. नांदेड तहसील कार्यालयात सुद्धा परिसरात पाणी साचले होते. दरम्यान २२ आणि २३ तारखेला अतिवृष्टी होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शहरात दोन दिवसापासून सूर्यदर्शन झाले नाही.
.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज