अ‍ॅपशहर

पैठण रोड ‘न्हाही’कडे

औरंगाबाद-पैठण रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (न्हाही) करण्याचा निर्णय गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालासंदर्भात (डीपीआर) शासनाच्या स्तरावर आठ दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.

Maharashtra Times 20 Jan 2017, 3:00 am
औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (न्हाही) करण्याचा निर्णय गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालासंदर्भात (डीपीआर) शासनाच्या स्तरावर आठ दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम paithan road handed over to nhai
पैठण रोड ‘न्हाही’कडे

औरंगाबाद - पैठण आणि औरंगाबाद - जळगाव, पहूर - मुक्ताईनगर या रस्त्यांच्या कामांसंदर्भात मुंबईत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. रस्ते विकास महामंडळाकडे असलेला औरंगाबाद-पैठण हा रस्ता या बैठकीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आला. या रस्त्याच्या कामासंदर्भात रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. त्याआधारे प्राधिकरणाने काम करावे की नवीन डीपीआर तयार करावा यासंदर्भात येत्या आठ दिवसांत शासनाच्या स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे. ‘डीपीआर’बद्दल निर्णय झाल्यावर टेंडर काढून लगेचच रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे.

जळगाव रोड दुपदरीच?
औरंगाबाद-जळगाव, पहूर-मुक्ताईनगर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करून घेण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता. प्राधिकरणाने या रस्त्याचा विचारच केला नाही. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडेच ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे चार पदरीऐवजी हा रस्ता दुपदरीच असेल, असे मानले जात आहे. बैठकीला रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज