अ‍ॅपशहर

मला वगळून उमेदवारी अर्ज भरला जाऊ शकत नाही: पंकजा मुंडे

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना भाजपनं समर्थकांना डावलल्यामुळं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. पंकजा यांनी आज त्यावर खुलासा केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2020, 8:12 am
औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत समर्थकाला उमेदवारी न मिळाल्यामुळं नाराज असल्याच्या चर्चेचं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज खंडन केलं. 'मी नाराज नाही. मला वगळून पक्षानं उमेदवार दिलेला नाही आणि मला वगळून उमेदवारी अर्जही भरू शकत नाही. मी स्वत: इथे आहे,' असं पंकजा यांनी आज सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pankaja Munde


मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपनं शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बोराळकर यांच्या विरोधात भाजपचे रमेश पोकळे व प्रवीण घुगे यांनी बंडखोरी करून अर्ज भरला आहे. हे दोघेही पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात.
पदवीधर निवडणूक: राष्ट्रवादीत खळबळ; मंत्र्याच्या निकटवर्तीयाचा बंडाचा झेंडा

त्याच अनुषंगानं पत्रकारांशी बोलताना आज पंकजा मुंडे यांना आपली भूमिका मांडली. 'मी नाराज नाही. कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांच्याशी संवाद कसा साधायचा हे मला माहीत आहे,' असं पंकजा यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. यापूर्वी गोपीनाथ मुंडे उमेदवार निश्चित करायचे. आता त्यांच्या मुलीला वगळून उमेदवार ठरवले जातात, असं विचारलं असता, 'तसं काही नाही. तसं चित्र रंगवू नये,' असं पंकजा म्हणाल्या. 'रमेश पोकळे किंवा प्रवीण घुगे यांना माझे समर्थक म्हणणं चुकीचं आहे. ते भाजपचे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत. राजकारणात माझा जन्म होण्याच्या आधीपासून ते पक्षात आहेत,' असं पंकजा म्हणाल्या. मात्र, ते भाजपचे कार्यकर्ते असले तरी तुमचा शब्द मानतात, असं विचारलं असता, 'मी त्यांना शब्द टाकेन. असंही त्यांनी सांगितलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे उपस्थित होते.

वाचा: 'शिवसेनेमुळं काँग्रेसला काय-काय ऐकावं लागतंय'

वाचा: त्यातील सत्य काय ते नितीशकुमारांनाच माहीत; शिवसेनेचा टोला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज