औरंगाबाद : ब्राह्मण युवक सेनेतर्फे परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद चौकात आयोजित कार्यक्रमास भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शिवसेना उप जिल्हाप्रमुख राजेंद्र आदमाने, मराठवाडा विकास सेनेचे सुभाष पाटील, माजी नगरसेविका अर्चना निळकंठ, सुरेंद्र कुलकर्णी, सागर निळकंठ, शैलेश निळकंठ, संगिता सहस्त्रबुद्धे, सुरेश पारीख, राजेश कुलकर्णी, भगवानदादा उदावंत, मंगेश मुंगीकर, महेश दोरवट आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष दर्शन पाठक, सागर पाटील, विकास राठोड आदींनी परिश्रम घेतले.
जैबुनिसा बाजी यांची निवड
औरंगाबाद : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी जैबुनिसा बाजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष मेहराज पटेल यांनी त्यांना नियुक्तपत्र दिले. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय, शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, कार्याध्यक्ष खाजा भाई, वीणा खरे आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले. यावेळी सलमा बानो, प्रतिभा वैद्य, सलमा बेगम, मंजुषा पवार, नाझिमा बाजी, विजय कांबळे, राजू थोरात, शिवाजी कवडे आदी उपस्थित होते.