अ‍ॅपशहर

नको आमदार, नको मंत्री; इथल्या लोकांची 'ही' एकच मागणी; अनोख्या पोस्टरची जोरदार चर्चा

नवीन सरकारमध्ये औरंगाबादच्या वाट्याला मंत्रीपद, पालकमंत्री , कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गुलमंडी भागात व्यापारी आणि नागरिकांनी शौचालय नसल्याने आम्हाला मंत्री नको आम्हाला मुत्री द्या, अशा प्रकारचे बॅनर बाजारपेठेत ठिकठिकाणी लावले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2022, 2:28 pm
औरंगाबाद: नवीन सरकारमध्ये औरंगाबादच्या वाट्याला मंत्रीपद, पालकमंत्री , कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गुलमंडी भागात व्यापारी आणि नागरिकांनी शौचालय नसल्याने आम्हाला मंत्री नको आम्हाला मुत्री द्या, अशा प्रकारचे बॅनर बाजारपेठेत ठिकठिकाणी लावले. हेच बॅनर आता चर्चेचा विषय ठरत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aur banner
औरंगाबादमधील बॅनरची जोरदार चर्चा


शिवसेनेची बंड पुकारत औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर भाजपसोबत शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यामुळे आता औरंगाबादच्या वाट्याला अनेक मंत्रीपदे किंवा पालक मंत्री पद मिळेल अशा चर्चांना उधाण आले आहे. औरंगाबादचे बंडखोर आमदार मंत्रीपद मिळावे म्हणून मुंबईत शक्तीप्रदर्शन करत आहेत. मात्र दुसरीकडे त्याच औरंगाबाद येथील राजकीय हब आणि प्रमुख बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गुलमंडी भागात व्यापारी एक वेगळ्या समस्येने त्रस्त आहेत.
VIDEO: हाण की बडीव! एका बॉयफ्रेंडवरून दोघी भिडल्या; लाथाबुक्क्यांनी हाणलं, काठीनं चोपलं
गुलमंडी ही औरंगाबाद शहराची प्रमुख बाजारपेठ समजली जाते. या बाजारपेठेत रोज हजारो ग्राहक खरेदीसाठी येत असतात. परिसरामध्ये गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून असलेली एकमेव मुत्री (शौचालय) महानगरपालिकेने तोडली आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. त्यामुळे स्थानिकांनी बाजारपेठेच्या अवतीभवती आम्हाला मंत्रीपद नको, आम्हाला पालकमंत्री नको, आम्हाला केंद्रीय मंत्री नको, आम्हाला मुत्री द्या, अशा आशयाचे बॅनर ठीक ठिकाणी लावले आहे. आता हे बॅनर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे.

महत्वाचे लेख