अ‍ॅपशहर

परीक्षा पास करण्यासाठी घेतली नऊ लाखांची सुपारी; हायटेक पद्धत वापरली पण झाली एक चूक अन्...

Dummy Student In Aurangabad: शिपाई पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण करून देण्यासाठी नऊ लाखांची सुपारी घेतली. हायटेक यंत्रसामग्रीसह परीक्षा केंद्रावर गेला मात्र सुरक्षा रक्षकाला संशय आला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2023, 1:33 pm
औरंगाबाद: शिपाई पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण करून देण्यासाठी नऊ लाखांची सुपारी घेतली. हायटेक यंत्रसामग्रीसह परीक्षा केंद्रावर गेला मात्र सुरक्षा रक्षकाला संशय आला आणि अंगझडती दरम्यान डमी परीक्षार्थीचे बिंग फुटले. ही धक्कादायक घटना औरंगाबादेतील एम.आय. डी. सी सिडको भागात समोर आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dummy student arrested


पोलिसांनी मूळ आणि डमी दोन्ही विद्यार्थांना बेड्या ठोकल्या असून या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अविनाश सजन गोलमाडू वय -२१ (रा.शिवगाव, ता.वैजापूर, जी.औरंगाबाद) असे डमी परीक्षार्थीचे नाव आहे. तर विकास सहुबा शेळके वय-२३ (रा. टाकळी, ता.कन्नड) असे मूळ परीक्षार्थीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शिपाई पदासाठी एम. आय.डी. सी. सिडको परिसरातील आय ऑन डिजिटल झोनमध्ये बुधवारी सकाळी ९ ते १० दरम्यान होती. या परीक्षेला ८०० पैकी ५३३ विद्यार्थी हजर होते. विद्यार्थांना प्रवेशपत्र पाहून सोडण्यात येत होते. त्यानंतर अंगझडती घेण्यासाठी सुरक्षारक्षक हॉलमध्ये गेला. तेथे परीक्षार्थींची झडती घेत असताना अविनाशच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने सुरक्षारक्षकाने अविनाशची बारकाईने झडती घेतली असता त्याकडे हायटेक यंत्रसामग्री आढळून आली.

वाचाः मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी; तालिबानी असल्याचा दावा करत NIAला धमकीचा मेल

अविनाशकडे एटीएम ट्रान्समीटर, ब्लूटूथ डीवाइस, माखिखी ईअरफोन होते. या प्रकरणी केंद्र व्यवस्थापक वैभव पवार यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचाः सर्वसामान्यांचा चहा महागणार! गोवर्धन, अमूलने दूधाचे भाव वाढवले; आजपासून नवे दर लागू

तपासादरम्यान शिपाई पदाची परीक्षा पास करण्यासाठी अविनाशने विकासकडून नऊ लाखांची सुपारी घेतली होती. परीक्षा देऊन आल्यावर दहा हजार व उर्वरित रक्कम उतीर्ण झाल्यावर देण्याचे ठरले होते. मात्र त्याअगोदरच बिंग फुटले आहे. यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाचाः आकाशातून जाणाऱ्या रहस्यमय वस्तूचं गूढ उलगडलं; नाशिक, विदर्भासह, नागपूरकरांनी नेमकं काय पाहिलं?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज